उद्याचं बजेट UP आणि पंजाबच्या निवडणुका समोर ठेवून जाहीर करतील; जयंत पाटलांची भविष्यवाणी

'इंधनावरचे कर कमी करणं आणि आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणे, हे मोदी सरकारने काम केलं तर त्यांचं कौतुक होऊ शकतं'
उद्याचं बजेट UP आणि पंजाबच्या निवडणुका समोर ठेवून जाहीर करतील; जयंत पाटलांची भविष्यवाणी
उद्याचं बजेट UP आणि पंजाबच्या निवडणुका समोर ठेवून जाहीर करतील; जयंत पाटलांची भविष्यवाणीSaam TV
Published On

मुंबई : जेव्हा पासून नरेंद्र मोदी सरकार (Modi sarkar) आलेलं आहे, तेव्हापासून ज्या केंद्रीय योजना आहेत त्यामध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत किंवा त्या पद्धतीच्या योजना देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्‍याच कमतरता तुटवडा मागच्या काही वर्षात सुरू झालं असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी केलं. ते आज मंत्रालया शेजारील महात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत, त्यामध्ये केंद्राचा आणि राज्यात एकूण केंद्राचा मोठा हिस्सा असायला हवा मात्र सध्या काही तसं दिसत नाही. तसंच पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तोटा मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांच्या खिशाला बसत असल्याचं वक्तव्य देखील पाटील यांनी यावेळी केलं.

बजेट UP, पंजाबच्या निवडणुका समोर ठेवून

उद्याचं बजेट UP आणि पंजाबच्या निवडणुका समोर ठेवून जाहीर करतील; जयंत पाटलांची भविष्यवाणी
Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

इंधनावरील (Fuel) कर कमी करणं, आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणं हे मोदी सरकारने काम केलं, तर त्यांचं कौतुक होऊ शकतं असा सल्ला ही त्यांनी मोदी सरकारला दिला. दरम्यान, उद्याचा एक तारखेचा बजेट (Budget) उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुका समोर ठेवून जाहीर केला जाईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना मधल्या काळात विरोधात गेलेले आहेत त्यांना भाजप चुचकरण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज व्यक्त करत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न देखील केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com