Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

'आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, आणि म्हणणारही नाही. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच त्यामुळे जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात, मद्यपान हानिकारकच आहे'
Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपेSaam TV
Published On

सोलापूर : आम्ही कुणाला वाईन प्या, असे म्हणू शकत नाही, आणि म्हणणारही नाही, सिगारेटवरती देखील धोक्याची सूचना लिहिलेली असते, तसंच मद्यपान हानिकारकच आहे. असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) सोलापुरात केलं आहे.

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन (Wine) विकण्याची परवानगी दिली आहें मात्र यावरुनच आता राजकारण चांगलच तापलं आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपने (BJP) विरोध केला आहे. तर सरकारने या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. तर, वाईन विक्रीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल असा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

हे देखील पहा -

असं वाईन वरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरु असतानाच आणि तुम्ही तरुणाईला व्यसनाच्या आहारी घालवणार का ? असे प्रश्न विरोधक आणि सामान्य जनता उपस्थित करत असताना याबाबतीत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे.

मद्यपान हानिकारकच -

'आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, आणि म्हणणारही नाही. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच त्यामुळे जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात, मद्यपान हानिकारक आहेच त्याविषयीची जागृती आपण करत असतो' असं वक्तव्य आरोग्य मंत्री यांनी सोलापुरात (Solapur) केलं आहे.

Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कांदा, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य

शेतकरी द्राक्ष (Grapes) बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही असही आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com