कांदा, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य

'कदाचित 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही, कारण ह्या सर्व गोष्टी फक्त पंधानमंत्री नरेंद्र मोदीच करू शकतात'
कांदा, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य
कांदा, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्यSaam TV
Published On

कल्याण : गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत (Pakistan-occupied Kashmir) देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही, कारण ह्या सर्व गोष्टी फक्त पंधानमंत्री नरेंद्र मोदीच करू शकतात असं वक्तव्य केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil) यांनी केलं आहे. ते कल्याणमध्ये  सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत हे मत व्यक्त केले आहे.

370 हटवंण त्यांच काम होतं -

कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. नरसिंह रावांचे उदाहरण दिले होते. अशी आठवणही मंत्री पाटील यांनी यावेळी करुन दिली. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करून घेतला असता त्यामध्ये असे नमूद केले होतं की, काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या असून पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे आणि हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.

हे देखील पहा -

असं वक्तव्य तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P.V. Narasimha Rao) यांनी केले होते आणि याचाच दाखला देत मोदींनी विरोधकांना उत्तर दिलं की, तुमच्याकडून ते तुमचं काम झालं नाही म्हणून आम्ही करतोय.असं सांगतच पाटील म्हणाले, तर आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर (Pakistan-occupied Kashmir) भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी सांगितले.

ते भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत -

कांदा, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य
UP Election: अखिलेश म्हणतात भाजपला 'खदेडा होईबे'

दरम्यान कांदे-बटाटे, मुगडाळ, तूरडाळ, यासारख्या महागाईतून आपण बाहेर आलं पाहिजेच मात्र देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नाही मात्र कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचंही कपिल पाटील यांनी वक्तव्य केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com