'देशाच्या संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळतं; ही संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी घटना'

'भारताच्या संरक्षण प्रमुखांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळतं ही घटना धक्कादायक असून संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी ही घटना आहे.'
'देशाच्या संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळतं; ही संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी घटना'
'देशाच्या संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळतं; ही संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी घटना'SaamTV
Published On

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आज नेहरू सेंटरला कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी उपस्थित आहेत. यावेळी भाषण करताना जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं.

हे देखील पहा -

पाटील म्हणाले, 'केंद्र सरकार विरोधात बोललं तर पाहुणे घरी येतात, आमचे नवाब मलिक (Nawab Malik) रोज या पाहुण्यांची वाट पाहत आहेत. आपण सरकारविरोधात बोललो नाही तर पाहुणे दुर्लक्ष करतात एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून ते काम करतात का? असा संशय येतो असं वक्तव्य त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाबाबत केलं तसंच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरी सात वेळा या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत, याबाबतीत निदान दरोडेखोर तरी एकदाच दरोडा टाकता मात्र इथं चित्र वेगळंच असल्याचा टोलाही पाटील यांनी यावेळी तपास यंत्रणांना लगावला.

'देशाच्या संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळतं; ही संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी घटना'
म्हाडाचा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती

तसेच लखीमपूर घटनेमध्ये 6 दिवस मंत्र्यांच्या मुलाला अटक केली नाही, अजून मंत्र्यांचा राजीनामा घेतला शिवाय भारताच्या संरक्षण प्रमुखांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळतं ही घटना धक्कादायक असून संरक्षण यंत्रणेवर ही घटना संशय व्यक्त करणारी आहे. चौकशीत काय समोर येतेय हे पाहावे लागेल असं सुचक वक्तव्यं देखील त्यांनी केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com