Jayant Patil: उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेले आमदार परतणार; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

'एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आमगार पश्चाताप करत असून काही आमदार परत येण्याच्या मार्गावर आहेत.'
Jayant Patil vs Eknath Shinde
Jayant Patil vs Eknath ShindeSaam TV
Published On

Jayant Patil : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेले आमगार पश्चाताप करत असून काही आमदार परत येण्याच्या मार्गावर असल्याचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पाटील यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेला भगदाड पाडत ४० आमदार आणि १२ खासदारांना आपल्या बाजूने घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार करणारं एकनाथ शिंदे यांचं बंड राज्यासह देशभरात गाजलं. शरद पवारांसारख्या (Sharad Pawar) दिग्गज नेत्यांनी देखील शिंदे हे आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय आपल्या या बंडाची दखल केवळ राज्याने आणि देशाने नव्हे तर जगभरात घेतल्याचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर याच शिंदेच्या गटातील आमदारांची नाराजी बाहेर पडायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. मग ते संजय शिरसाट असो वा बच्चू कडू हे दोघे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Jayant Patil vs Eknath Shinde
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या 'नायक' स्टाईलने लक्ष वेधलं, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकताच खाली उतरुन...

अशातच आता शिंदेच्या गटातील अनेक आमदार त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप करत आहेत. शिवाय पक्षातून फूटून गेल्यामुळे बदनामी झाली शिवाय मंत्रीपद देखील मिळालं नाही त्यामुळे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तसंच हे आमदार काहीतरी प्रलोभन आणि काही उद्देश ठेवून या पक्षांतर केलं असल्याचं सर्व लोकांना कळालं आहे. शिवाय याच बदनामीच्या पोटी हे सर्व आमदार पुनर्विचार करत असून पुढच्या काळात चित्र वेगळं असेल असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com