Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या 'नायक' स्टाईलने लक्ष वेधलं, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकताच खाली उतरुन...

हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी 'टॉप प्रायोरिटी'वर लक्ष देण्याची गरज असून या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे.
Supriya Sule News
Supriya Sule NewsSaam TV
Published On

सचिन जाधव -

पुणे : पुण्यात (Pune) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे - सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही बसला आहे. मात्र, यावेळी त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. सुप्रियाताईंचा हा हटके आणि नायक स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर (Social Media) सतत अॅक्टीव असतात. नागरिकांना होणाऱ्या अडचणी समजावून घेत त्या सरकार दरबारी मार्गी लावण्यासाठी त्यांनी या सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे.

मग रत्यांवरती पडलेले खड्डे असो वा एखादं आवडलेलं ठिकाण किंवा हॉटेल असो या बाबतच्या सर्व अपडेटस सुप्रियाताई आपल्या सोशल मीडियावर सतत देत असतात. अशातच आता त्यांचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये हडपसर ते सासवड (Hadapsar to Saswad) असा प्रवास करत असताना एक गाडी अचानक बंद पडल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांनी तात्काळ ती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आवाहन करत स्वत: देखील त्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी वाहतूक पोलिसांशी (Traffic Police) साधलेला संवाद आणि वाहतूकचालकांना केलेल्या सुचना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

Supriya Sule News
Bhaskar Jadhav : राणे कुटुंबीयांवरती टीका केल्यामुळे भास्कर जाधव अडचणीत; पुण्यात गुन्हा दाखल

शिवाय हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी 'टॉप प्रायोरिटी'वर लक्ष देण्याची गरज असून या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे. सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होतं आहे असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे संसदरत्न ठरलेल्या सुप्रिया सुळे जशा लोकसभेत आपलं काम जोख बजावतात तसंच काम अगदी रस्त्यावरुन जाताना देखील करतानाचा प्रत्यय आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com