Uddhav Thackeray: मी त्यांचं कौतुक करतो.. राज ठाकरेंच्या 'बिनशर्त' पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान!

Maharashtra Polititics: उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी होणार आहे, असे म्हणत पुन्हा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Maharashtra Polititics:
Maharashtra Polititics: Saamtv

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १३ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच जळगावचे बी.आर एस चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी होणार आहे, असे म्हणत पुन्हा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. "मी त्यांचं कौतुक करतो. काही जण उघडं उघडं पाठिंबा देतात. काही लोक लढण्याचे नाटक करुन पाठिंबा देतात. ही नाटकं आता जनता आता ओळखते," असे ते यावेळी म्हणाले.

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही....

तसेच भारतीय जनता पक्ष, बीआरएस, वंचितमधून कंटाळलेले त्रासलेले पदाधिकारी इंडिया आघाडीत, महाविकास आघाडीत येत आहेत. गेल्या १० वर्षांपासून हा असंतोष पाहायला मिळत आहे. येणाऱ्या लोकसभेत लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी लढत होणार आहे. एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. संमिश्र सरकारच्या काळातच देशाची प्रगती झाली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Polititics:
Dharashiv News : परंड्यात नऊ दिवसापासून पाणीबाणी, नागरिकांचा पालिका कर्मचाऱ्यांना घेराव; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार

"शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला एवढी लोक भाड्याने का घ्यावी लागतात?? तुमच्या इंजिनाचे चाके निळखली आहेत. तुमची ओरिजनल लोक गेली कुठे? माझ्याकडे जी भाजपची (BJP) लोक येतायतं ती तुम्हाला का कंटाळली. त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी विचार करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो," असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Maharashtra Polititics:
Nashik Crime: पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये गेला.. दुसऱ्या दिवशी तळघरात मृतदेह आढळला; नाशिकमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com