Apple च्या iPhone 16 सीरिजचा सेल आजपासून सुरू झाला आहे. कंपनीने भारतामध्ये iPhone 16 सीरिजच्या विक्रीला सुरूवात केली. iPhone 16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईतल्या बीकेसीमधली Apple स्टोअरबाहेर सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली असून त्याठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी घटना घडली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि दिल्लीतील ॲपल स्टोअर्समध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. एवढी गर्दी होती की बीकेसीतील Apple स्टोअरबाहेर चेंगराचेंगरी झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळावी लागली. गर्दीला आटोक्यात आणणे सुरक्षा कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. iPhone 16 खरेदी करण्यासाठी अक्षरश: नागरिक पळत पळत जात आहेत.
न्यूज एजन्सी पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो मुंबईतील ॲपलच्या बीकेसी स्टोअरचा आहे. सकाळी सातच्या सुमारास ॲपल स्टोअरसमोर मोठी गर्दी दिसून आली. यावरून भारतात iPhone 16 ची किती क्रेझ आहे हे स्पष्ट दिसून येत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना खूपच कठीण झाले होते.
iPhone 16 सीरिजमध्ये चार फोन आहेत. यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. यामध्ये कॅमेरा कंट्रोल बटण आणि ऍपल इंटेलिजेंस यासारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही हे फोन ऍपल स्टोअर किंवा क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स सारख्या स्टोअरमध्ये प्री-बुक करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.