Mumbai: "शिवाजी महाराज महाविकास आघाडीचे प्रेरणास्थान" - पालकमंत्री अस्लम शेख

Mumbai: मुंबई ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) प्रेरस्थान आहेत आम्ही आजही सर्व एकत्र त्यांच्या विचारावर चालतो.
Mumbai: Inspiration of Shivaji Maharaj Mahavikas Aghadi
Mumbai: Inspiration of Shivaji Maharaj Mahavikas AghadiSaam Tv News
Published On

मुंबई: आज राज्यभरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. मुंबईचे (Mumbai) पालकमंत्री तथा कॉंग्रेस नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महाविकास आघाडीबद्दल वक्तव्य केलं आहे. मुंबई ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) प्रेरस्थान आहेत आम्ही आजही सर्व एकत्र त्यांच्या विचारावर चालतो. (Inspiration of Shivaji Maharaj Mahavikas Aghadi said Guardian Minister Aslam Sheikh)

हे देखील पहा -

नारायण राणेंबाबतत ते म्हणाले की, देशात अनेक विषय आहेत. मागील ७ वर्षांत भाजपने राज्य नसलेल्या ठिकाणी भाजप दबाव टाकून फोडाफोडीचं राजकारण करत आहे. तसेच केंदीय तपास यंत्रणां जसे ईडी, सीबीआय यांच्यावरही अस्लम शेख यांना टीका केली आहे. याबाबत ते म्हणाले की, ईडी. सीबीआयचा चुकीचा वापर भाजपकडून सुरू आहे. नोकऱ्या नाहीत, कुपोषण, शेतकरी आत्महता, सैनिक मरत आहे. अशावर सरकार चर्चा करत नाही. मात्र दिशा सालियान आणि सुशांत सिंह सारखे मुद्दे बोलत राहतात. भाजपला काही काम धंदा आहे की नाही, ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही अशा ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे. ही लोकशाहीची हत्या आहे.

Mumbai: Inspiration of Shivaji Maharaj Mahavikas Aghadi
किरीट सोमय्या उद्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर राहणार

मच्छीमार बाँधवांबाबत ते म्हणाले की, मच्छीमार संघटनांना डिझेल पर्तावाचे पैसे मागील सरकरने 200 कोटी परतावा दिला नाही. तोही आम्ही देतोय, टप्या टप्याने ही प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे अनलाॅकबद्दल ते म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण कमी आहे. ९० टक्के अनलाॅकडाऊन करण्यात आले आहे. टाक्सफोर्सच्या मार्गदर्शनानुसार याचे कौतुक सर्वांनी केले आहे. कुठचेही पाऊल उचलताना टास्कफोर्स आणि संस्थांचे मार्गदर्शन घेऊनच पाऊल उचलणार असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com