किरीट सोमय्या उद्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर राहणार

छगन भुजबळ बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केली, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या
किरीट सोमय्या Saam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई - दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांना कलम 188 अंतर्गत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत नोटीस पाठवली होती. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले होते आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) उद्या सकाळी ११.३० वाजता सांताक्रूझ पोलीस स्टेशनला हजर राहणार आहेत. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केली, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya Latest News)

पोलिसांनी पाठवलेली नोटीस ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या ट्विटमध्ये सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पोलिसांची माझ्याविरुद्ध आणखी एक नोटीस असे म्हटले आहे. भुजबळ यांच्या सांताक्रूझ येथील ९ मजली बेनामी बंगल्याची पाहणी केल्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com