Camlin Ex-Chairman Death: कॅम्लिन उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर काळाच्या पडद्याआड; उद्योग आणि सामाजिक वर्तुळात शोककळा
मुंबई : कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ आणि हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणारे उद्योजक सुभाष दांडेकर यांचं सोमवारी निधन झालं आहे. दांडेकर यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सुभाष दांडेकर यांची कॅम्लिन कंपनी ही देशातील आघाडीची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमार्फत शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई या उत्पादनांची निर्मिती केली जाते. तसेच या कंपनीकडून कलाकारांसाठी लागणारे साहित्य, कार्यालयीन उत्पादन आणि व्यावसायिक उत्पादनांचीही निर्मिती करते. सुभाष दांडेकर यांनी कॅम्पिन कंपनीची अनेक वर्षे धुरा सांभाळली. त्यांच्या निधनानंतर मराठमोळा आणि आघाडीचा उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कॅम्लिनचे सुभाष दांडेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताला महत्व दिलं. तसेच त्यांच्या श्रमालाही महत्व दिलं. नवनवीन तंत्रज्ञान,कौशल्ये आत्मसात करून सतत शिकण्याचा सातत्याने भर असायचा. ते आयुष्यात नवं शिखर गाठण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. प्रत्येक काम चांगलं काम करण्यावर नेहमी भर असायचा. कॅम्लिन कपंनीच्या वाटचालीत त्यांनी मोलाचा वाटा उभारला.
दांडेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ललित गांधी म्हणाले, 'महाराष्ट्रातील सर्व व्यापारी व्यक्ती या बातमीने दु:खी झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगजगतातील ते प्रमुख व्यक्तिमत्व होतं. त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत चेंबर्सने अनेक व्यापार सुरु केले'.
'अनेक नवीन उपक्रम सुरु केले. रंगाच्या साम्राज्यात त्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं. त्यांनी हजारो उद्योगांना बळ दिले. तसेच मराठी जणांना रोजगार उपलब्ध करून दिले. त्यामुळे आपला आधारवड गेल्याची भावना ही व्यापारी उद्योजकांत आहे. त्यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात संपूर्ण उद्योजक वर्ग सहभागी आहेत, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.