Andheri Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत EVM मशीन हॅक? अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक झाला असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे कांबळे यांनी केला आहे.
Andheri East Bypoll Election EVM Milind Kambale
Andheri East Bypoll Election EVM Milind KambaleSaam TV

निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Andheri East Bypoll Election Result : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक झाला असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केला आहे. निवडणुकीत मला 12 हजार मतदान पडेल, अशी शाश्वती होती. मात्र, मला 614 मतं पडली. त्यामुळे माझे मतदान ईव्हीएमधून ट्रान्सफर झाले असल्याचा मला संशय आहे, असं मिलिंद कांबळे यांनी म्हटलं आहे.

Andheri East Bypoll Election EVM Milind Kambale
देशातील पोटनिवडणुकीत भाजपचं वर्चस्व; 7 पैकी 4 जागांवर विजय

इतकंच नाही तर, निवडणुकीत उभ्या असलेले इतर तीन उमेदवार बाळा नाडार (1515 मतं), नीना खेडेकर (1531 मतं) राजेश त्रिपाठी (1571 मतं) या तिघांनाही अनुक्रमे 1500 च्या घरातच मतदान झाल्याने ईव्हीएम मशीन फेरफार झाला असण्याची दाट शक्यता आहे, असा खळबळजनक आरोपही कांबळे यांनी केला आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीला मी मुंबई उच्च न्यायालयात चॅलेंज करणार असल्याचंही मिलिंद कांबळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मिलिंद कांबळे यांनी यापूर्वी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर गंभीर आरोप केले होते. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाकरे गटाने आपल्यावर दबाव आणला असल्याचं त्यांनी म्हटलं होते. आता तर कांबळे यांनी थेट निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक झालं असल्याचा आरोप केला आहे.

Andheri East Bypoll Election EVM Milind Kambale
Nagpur Crime : १५ वर्षीय विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅनचालकानेच केला अत्याचार; काळिमा फासणारी घटना

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena)  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांना तब्बल 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसरा नंबर नोटाचा आहे. 'नोटा'ला तब्बल 12 हजार 776 इतकी मतं मिळाली आहे.

अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झालं. त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. ही जागा काबिज करण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने कंबर कसली होती. लटके यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेवारी दिली होती. मात्र, मुरजी पटेल यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता.

मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून 'नोटा'चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात होता. लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. 

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com