
पुणे - आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्राध्यापक भरती व्हावी यासाठी नवमहाराष्ट्र नव प्राध्याप यांनी अर्धनग्न आंदोलन केले. तर ग्रंथपाल भरती व्हावी यासाठी ग्रंथपालांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रस्त्यावरून उतरून जय जवान जय किसनचा नारा देत घंटानाद करत टाळ्या वाजवत सरकारचे लक्ष वेधले स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तीनही आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यादिनी सेंट्रल बिल्डिंगला आदोलकांनी वेढा घातला आहे आवारात एकाचवेळी ३ आंदोलने सुरु आहेत.
एकीकडे १९ जुलैपासून बेमुदत साखळी उपोषणाचा 28 वा दिवस असून आपला विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आपल्या उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व सहसंचालक कार्यालय, नागपूर येथे शासनाचा निषेध म्हणून आज स्वातंत्र्यदिनी अर्धनग्न आंदोलन नवप्राध्यापक संघटनेन सुरू केलं आहे.
हे देखील पहा -
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले हा राष्ट्रीय उत्सव म्हणून भारतात अतिशय उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. परंतु मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या नाकर्तेपणामुळे आज १५ ऑगस्ट २०२१ या ७५ व्या स्वातंत्र्यदिनीसुद्धा देशाप्रति आदर व अभिमान असूनसुद्धा आम्हांला अर्धनग्न आंदोलन या दिवशी करावं लागत आहे ही शोकांतिका आहे.
शासनाने आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. या दिवशी तरी जाग यावी म्हणून प्राध्यापक पदभरती ही शंभर टक्के व्हावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने गेल्या 28 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे व संचालनालय कार्यालयवर सुरू आहे.
या आंदोलनाची शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. महाराष्ट्रातील ७०,००० तमाम पात्रताधारकांचे व वाटोळं करण्याचं काम मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांनी केले असा आमचा आरोप आहे. प्रतिकात्मक निषेध म्हणून अर्धनग्न आंदोलन करून दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या शासनाला या माध्यमातून जागे करण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे, १२ ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ च्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यासाठी ग्रंथपालांचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली.
तर याच ठिकाणी तिसरे आंदोलन शेतकऱ्यांचे सुरु आहे. डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने २०२० च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा पिक विमा देण्यात यावा व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी डोंगर भागातील शेतकरी कृषी आयुक्ता कार्यालय पुणे समोर घंटा नाद आंदोलन करीत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.