Crematorium Animal: मुंबईत प्राण्यांसाठी दहनभूमीची व्यवस्था; वाचा सविस्तर माहिती

BMC News: प्राणीमित्रांसाठी मोठी बातमी; पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा
Crematorium Animal
Crematorium AnimalSaam TV

Mumbai News:

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एक पाळीव प्राण्यांसाठी एक मोठी कामगीरी बजावण्यात आली आहे. लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Crematorium Animal
WhatsApp Animated Features : व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड अवतार पाठवता येणार, जबराट फीचर आलाय...

नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणीमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा करण्यात आली आहे. ही सुविधा १५ सप्टेंबर २०२३ पासून वापरासाठी सुरू होतेय.

प्राण्यांसाठीची ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येईल. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. सदर दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल आणि प्रचालन व्यवस्था आहे.

Crematorium Animal
Street Free Animals: जीव मुठीत घेऊन जगतायत अकोल्यातील नागरिक; रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com