
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी पुणे
शरीरयष्टी मजबूत आणि सुदृढ होण्यासाठी आपण व्यायामशाळेत जातो. मात्र, काही व्यायामशाळेत शरीरयष्टी चांगली होईल असे आमिष दाखवून स्टेरॉईड इंजेक्शन विकले जातात. असाच एक प्रकार पुण्यात घडला. काही व्यायामशाळांमध्ये बेकायदेशीररित्या स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री होत आहे. यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केलीय.
पुण्यातील व्यायाम शाळेत काही तरूणांना शरीरयष्टी चांगली होईल असे आमिष दाखवून, स्टेरॉईड इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आलीय. तसंच आरोपींच्या ताब्यातून ५ हजार रूपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आलं असल्याचं शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस चंद्रशेखर सांवत यांनी माहिती दिली आहे.
या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर आणि साजन अण्णा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे औषध बिल नसताना, औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्यावर गंभीर इजा होऊ शकते. ही बाब माहित असूनही बेकायदेशीररित्या याची विक्री केली जात होती. स्टेरॉईड इंजेक्शन त्यांनी कोठून आणलं? ते कुणाला विक्री करणार होते? त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत? याबाबात शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.
स्टेरॉईड इंजेक्शनमुळं महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे, तर युवकांचे हाडं ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे, जननेंद्रिय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बॉडी बनवण्यासाठी युवकांना स्टेरॉईड इंजेक्शनचं आकर्षण असतं. मात्र, स्टेरॉईडचं जितक्या लवकर परिणाम दिसून येतात, तितक्या लवकर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. स्टेरॉईडचा वारंवार वापर केल्यानं पुरूष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळं शक्यतो स्टेरॉईड इंजेक्शन घेणं टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.