बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी इगतपुरीतील आदिवासी शेतक-यांची मंत्रालयावर कूच

इगतपुरी तहसीलदार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न न सुटल्याने माेर्चा काढल्याचे आंदाेलकांनी सांगितले.
igatpuri adivasi farmers morcha at mantralay
igatpuri adivasi farmers morcha at mantralaysaam tv
Published On

- फय्याज शेख

Shahapur News :

इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतक-यांनी आपल्याला न्याय मिळावा तसेच फसवणूक करून धनदांडग्यांनी, दलालांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात तसेच समाजकंटकांवर कारवाई व्हावी यासाठी मंत्रायावर पायी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचला आहे. (Maharashtra News)

इगतपुरी तालुक्यातील भावली,चिंचले,आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतजमीन परत मिळाव्यात म्हणून गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव भूमाफियांवर व दलालांवर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारी आंदाेलन करीत आहेत. त्या पीडित शेतक-यांना अद्याप न्याय मिळालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

igatpuri adivasi farmers morcha at mantralay
Mathadi Kamgar Sanghatna: घाई गडबडीत माथाडी कामगार विधेयक मंजूर करु नये, 14 डिसेंबरला माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद : नरेंद्र पाटील

त्यामुळे शेतक-यांनी थेट मंत्रालयावर माेर्चा काढला आहे. हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचला आहे. बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेत जमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा या व अन्य मागण्यांचे फलक आंदाेलकांच्या हातात आहे.

या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे. सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटाच्या (kasara ghat) पुढे आला आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहेत तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चेकरांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

igatpuri adivasi farmers morcha at mantralay
Anganwadi Sevika Morcha: वैजापूर तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; घाेषणांनी परिसर दणाणला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com