हिंमत असेल तर खाली या; विश्वनाथ महाडेश्वर यांचं राणा दाम्पत्याला आवाहन

Navneet Rana Latest News: राणा दाम्पत्य राहतात त्या इमारतीच्या गेटपर्यंत शिवसैनिक पोहोचले आहेत.
f you have the courage, come down; Vishwanath Mahadeshwar's appeal to Rana couple
f you have the courage, come down; Vishwanath Mahadeshwar's appeal to Rana coupleSaam Tv

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आक्रमक शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून राणा दाम्पत्याच्या घराजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राणा (Navneet Rana) दाम्पत्याला घराबाहेर येण्याचं आवाहन केलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, राणा दाम्पत्यासाठी आम्ही शिवसैनिक (Shivsainik) राणा दाम्पत्याच्या घराखाली उभे आहोत. त्यांनी नऊची वेळ दिली आहे. हिंमत असेल कर त्यांनी खाली यावं. आम्ही वाट पाहतोय. ते खाली आल्यास शिवसैनिक त्यांना योग्य तो प्रसाद देतील. कारण त्या हनुमान चालीसा बोलणार आहे तर त्यांना योग्य तो प्रसाद द्यायला पाहिजे. (If you have the courage, come down; Vishwanath Mahadeshwar's appeal to Rana couple)

हे देखील पाहा -

सध्यातरी शिवसैनिक आक्रमक नाहीत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. सध्या ते शांत आहेत. राणा दाम्पत्याने पोलिसांचे आदेशाचं पालन करावं. कायदा - सुव्यस्थेचं पालन व्हाव. मात्र राणा दाम्पत्य खाली आल्यास त्यांना आक्रमकपणा काय असतो हे दाखवून दिलं जाईल. असं विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले आहेत.

मातोश्रीबाहेर जमलेल्या महिला शिवसैनिकांनी हातावर टॅटू काढले आहेत. यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांंचे टॅटू काढण्यात आले आहे. राणा दाम्पत्यांबाबत या महिला शिवसैनिक अतिशय आक्रमक झाल्या आहेत. खासदार नवनीत राणा मातोश्रीजवळ आल्यास त्यांना महाप्रसाद देऊ असं या महिला शिवसैनिक म्हणाल्या. राणा दाम्पत्य आज (शनिवारी) सकाळी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसेचं पठण करण्यासाठी येणार आहेत. मात्र, त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. यात महिला शिवसैनिकांचाही मोठा सहभाग आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com