Maharashtra Politics : सत्तासंघर्षावरील निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गट आक्रमक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shiv Sena Case Hearing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisSaamtv

निवृत्ती बाबर, मुंबई

Shiv Sena Case Hearing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून निर्णय घेण्यासंदर्भात आजच विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच, त्यासंदर्भातील निर्णय अध्यक्षांनीच घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सांगितले आहे. आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आता ठाकरे गटाकडून होऊ लागली आहे.

ठाकरे गटाकडून आजच विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र दिले जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे. एका महिन्यात अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात येणार आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या रक्तात विकासाचं व्हिजन नाही, 'रडोबा' झालेत; भाजप नेत्याची जहरी टीका

आमदारांवरील अपात्रतेसंदर्भातील कारवाईचा निर्णय महिनाभरात झाला नाही तर ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

अनिल परब काय म्हणाले?

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. अध्यक्षांनी १५ दिवसांत यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी आम्ही मागणी करणार आहोत, असे अनिल परब यांनी सांगितले.

Maharashtra Political Crisis
Ajit Pawar On Uddhav Thackeray: '...यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला', उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे स्पष्ट मत

सरकारमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या. त्याची मालिकाच होती. अध्यक्षांची निवड हा त्यातीलच एक आहे. अध्यक्ष हे न्यायाने वागले पाहिजेत. असं झालं नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिंदेंना दिलासा

अवघ्या राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल अखेर लागला. यामध्ये तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com