Ajit Pawar On Uddhav Thackeray: '...यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला', उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे स्पष्ट मत

Latest News: सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याविषयी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar On Uddhav Thackeray
Ajit Pawar On Uddhav ThackeraySaam Tv

Pune News: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी सुनावणी करत काही महत्वाची निरिक्षणं सांगितली. 'जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं.', असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले होते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, 'यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला.' असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Ajit Pawar On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Press Conference : 'देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा'; उद्धव ठाकरेंचे थेट PM नरेंद्र मोदींना आवाहन

पुण्यामध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले की, 'उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा वर कितीवेळा चर्चा उखरून काढायची. जे झालं त्याबद्दल आमचे मत मांडून काय फायदा आहे का?' तसंच, 'यातून सगळ्यांना जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला. इथून पुढे असा प्रसंग कोणावर येऊ नये. जर असा प्रसंग आला तर त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला समोर गेलं पाहिजे.', असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'बरीच राजकीय उलथापालथ झाली होती. निकाल येण्याच्या आधी लातूर दौऱ्यावर होतो. मी त्याच वेळी सांगितलं होतं की हा निकाल पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि तेच घडले. याचे परिणाम आता देशात अनेक ठिकाणी असा प्रसंग उभा राहील तेव्हा हा प्रश्न उभा राहील. पक्षांतर बंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे का नाही माहिती नाही.'

Ajit Pawar On Uddhav Thackeray
Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तात्काळ सुटकेचे आदेश

तसंच, 'बहुमत असताना सरकार चालत होते. पण आता खीळ बसली आहे. सगळ्या राजकीय पक्षांना संविधानने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यातून जनतेचा अपमान होता कामा नये. यातून कुठला ही निकाल लागला असता तर सरकारवर परिणाम होणार नव्हता. कारण त्यांच्याकडे बहुमत होतं. तेव्हाचे विधानसभेचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण तो राजीनामा द्यायला नको होता. आमच्या सगळ्यांकडून माहविकास आघाडीकडून तयारी केली असती तर विधानसभा अध्यक्ष आमचा बसला असता.' असे देखील अजित पवारांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com