राज्यपाल घटनेच्या विरुद्ध वागले तर सरकारला राजकीय पावलं टाकावी लागतील; संजय राऊतांचा इशारा

'विधानसभेच्या हक्क, लोकभावना डावलण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल हे अभ्यासू, विद्वान आहेत मात्र आता त्या अभ्यासाचा अजीर्ण होऊ नये.'
राज्यपाल घटनेच्या विरुद्ध वागले तर सरकारला राजकीय पावलं टाकावी लागतील; संजय राऊतांचा इशारा
Published On: 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाबत सरकार काय करते ? यावर मी बोलणार नाही. राज्यपालांचा काय उत्तर आहे ? त्यातही मला पडायचं नाही. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांकडे उत्तर पाठवलेला आहे ते तुमच्या समोर आहे. मी कालही म्हणालो होतो, राज्यपालांनी एवढा अभ्यास करू नये, जे घटनेमध्ये तरतूद आहे त्यानुसार राज्यपालांनी काम करावं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना दिली.

राज्यपाल घटनेच्या विरुद्ध वागले तर सरकारला राजकीय पावलं टाकावी लागतील; संजय राऊतांचा इशारा
मी राज्यपाल आणि महाविकास आघाडीचा प्रवक्ता नव्हे - चंद्रकांत पाटील

तसेच ते पुढे म्हणाले, 'विधानसभेच्या हक्क, लोकभावना डावलण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल हे अभ्यासू ,विद्वान आहेत मात्र आता त्या अभ्यासाचा अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवणामध्ये अभ्यासाचा अजीर्ण झालेला आहे. अजीर्ण झालं की त्रास सुरू होतो पोटाचा असा त्रास जर काही लोकांना झाला असेल तर महाराष्ट्राचा आरोग्य खाते सक्षम आहे उपचार करण्यासाठी असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला. तसंच राज्यपाल जर घटनेच्या विरुद्ध वागत असतील किंवा राज्यपालांना (Governor) अशा प्रकारचं राजकीय वर्तन करण्याचा दबाव असेल तर सरकारला सुद्धा राजकीय पावलं टाकावी लागतील असा इशाराही राऊत यांनी दिला.

हे देखील पहा -

दरम्यान मुख्यमंत्री आज अधिवेशनात (Convention) उपस्थित राहणार का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले विधानसभेचे अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झाल, आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहे तिथून हे अधिवेशन पूर्णपणे नियंत्रित करतात सरकारचा कामकाजामध्ये सहभागी होतात मात्र अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने त्यामुळे वेट अँड वॉच (Wait and watch) अशी खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com