माझी राजकीय हत्या होऊ शकत नाही; मी आत्महत्या करु शकत नाही: वसंत मोरे

Vasant More Latest News: मी घरच्या घरी पक्षाचा झेंडा बनवला ते दिवस मला अजूनही आठवतात असं सांगताना ते भावूक झाले होते.
I cannot be politically assassinated; I can't commit suicide: Vasant More,  Vasant More News, Vasant More latest News updates, Vasant More Interview
I cannot be politically assassinated; I can't commit suicide: Vasant More, Vasant More News, Vasant More latest News updates, Vasant More Interview Saam Tv
Published On

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी मशीदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर पुण्यातील (Pune) मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांची शहारध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी आपण मनसेतच (MNS) राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच आपली पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नसून आपल्याला पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे पण आपण पक्षातच आहे असं म्हणत माझी राजकीय हत्या होऊ शकत नाही तसेच मी राजकीय आत्महत्या करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (I cannot be politically assassinated; I can't commit suicide: Vasant More MNS)

हे देखील पहा -

पुण्यातील मनसेचे नगरसेवक असलेले वसंत मोरे यांनी मशीदीसमोर भोंगे लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशाला मानन्यास नकार दिला होत. एक लोकप्रतिनिधी म्हणून राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका अडचणीची आहे असं वसंत मोरे म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरेंचा आदेश, पक्षादेश जुगारल्याने त्यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. मात्र ते पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तसेच मी पक्षाचा सरचिटणीस आहे असंही ते म्हणाले आहेत. (Vasant More News updates)

मी काही महत्वाचा नेता किंवा मोठा नेता नाही -

इतर पक्षातून आलेल्या आमंत्रणाबद्ल ते म्हणाले की, मला जवळपास सर्वच पक्षातून ऑफर आली आहे. पण मी मनसे सोडणार नाही असं ते म्हणाले. तसेच आपण मनसेतील एक छोटा कार्यकर्ता असून मी काही महत्वाचा नेता किंवा मोठा नेता नाही असं म्हणताना वसंत मोरे भावूक झाले होते. आतापर्यंत मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला असल्याची त्यांनी माहिती दिली. पण, मी पक्ष सोडला नसल्याने कुणीही पक्ष सोडण्याच्या भानगडीत पडू नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

माझी राजकीय हत्या होऊ शकत नाही आणि आत्महत्या करणार नाही -

मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्या रुपाली ठाेंबरे-पाटील यांनी वसंत मोरेंवरीलव कारवाईबाबत म्हटलं होतं की वसंत मोरेंची राजकीय हत्या झाली आहे. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझी राजकीय हत्या होऊ शकत नाही आणि आत्महत्या वसंत मोरे करु शकत असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसंच रुपाली पाटील आणि माझी भूमिका वेगळी आहे असं ते म्हणालेत.

I cannot be politically assassinated; I can't commit suicide: Vasant More,  Vasant More News, Vasant More latest News updates, Vasant More Interview
होय! मी शरद पवारांचा माणूस : संजय राऊत

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मनसेचा बालेकिल्ला -

राज ठाकरेंशी असलेल्या संबंधांबाबत ते म्हणाले की, जेव्हा लोकांना पक्षाचं नावही कळत नव्हतं तेव्हापासून मी इथं आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मी मनसेचा बालेकिल्ला उभा केला असं ते म्हणाले. तसेच जेव्हा पक्षाला नाव नव्हतं, तेव्हापासून मी माझ्या गाडीवरती राजसमर्थक म्हणून नावं लिहीलं होतं. मी घरच्या घरी पक्षाचा झेंडा बनवला ते दिवस मला अजूनही आठवतात असं सांगताना ते भावूक झाले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com