पुणे : आत्तापर्यंत सासरच्या जाचाला किंवा नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायकोने आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना आपण ऐकल्यात, मात्र, पुण्यातील (Pune) उरुळी कांचन परिसरात बायकोच्या (wife) त्रासाला कंटाळून चक्क नवऱ्याने (Husband) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. आत्महत्येनंतर जवळपास एक महिन्यांनी सुसाईड नोट सापडली त्यानंतर बायकोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण घटनेच्या एक महिन्यानंतर मृत तरुणानं लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.
हे देखील पहा :
याप्रकरणी पोलिसांनी (Police) पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महावीर उत्तम जगदाळे असं आत्महत्या केलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे, तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघंही पती पत्नी मोल मजुरी करून घर चालवत होते. पण लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात पतीचं काम बंद झाल्यामुळे तो गावी निघून गेला होता. गावावरून परत आल्यानंतरही तो कामावर जात नव्हता. गेली काही दिवस तो घरीच बसून होता.
यामुळे रजनी यांनी आपल्या पतीची तक्रार सासऱ्यांकडे केली. समजूत घातल्यानंतरही मृत महावीर कामाला जात नव्हता. यामुळे पती पत्नीत वाद होऊ लागले होते. पत्नी उठता बसता आपल्या पतीला टोमणे मारू लागली. आरोपी पत्नीच्या त्रासाला कंटाळून महावीर याने 8 नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यामुळे बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.