दिवा : ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे.याच पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेनेनी भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपा (BJP) दिवा शीळ मंडळ अध्यक्ष तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष ॲड.आदेश भगत, अॅड.सुप्रिया आदेश भगत आणि माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे (Thane) जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून व भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
हे देखील पहा :
त्यामुळे दिवा (Diva) शहरात शिवसेनेची (Shivsena) ताकत वाढली आहे. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते अशोक वैत्ती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी उप-महापौर रमाकांत मढवी उपस्थित होते. दरम्यान, प्रवेश झाल्यानंतर दिव्यामध्ये फक्त शिवसेनेचाच ‘ आदेश ‘ अशी फेसबुक पोस्ट खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आला आहे. आदेश भगत हे भाजप होतेच कधी अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेत प्रभाग वाढले असून दिवा शहरात 1 नगरसेवक वाढणार आहे.आता दिव्यात 8 नगरसेवक आहेत आणि ते सर्व शिवसेनेचे आहेत. आता 1 नगरसेवक वाढत असल्याने शिवसेने तगडा उमेदवार म्हणून आदेश भगत याला पक्षात प्रवेश दिला अशी चर्चा आहे. दिवा गावातील वकील म्हणून आदेश भगत यांची ओळख आहे. तसेच आदेश भगत हे दिवा रेल्वे प्रवासी संघनेचे अध्यक्ष आहेत. आदेश याच्या घरचे मूळचे शिवसैनिक, तर आदेशने सुद्धा 2005 पासून 2014 शिवसेनेत कार्यरत होते. मात्र तेव्हा त्यांचे पक्षात वजन नसल्याने 2015 साली भाजप मध्ये प्रवेश केला आणि दिवा शहर मंडल अध्यक्षपद दिले.
दरम्यान, आदेश यांनी 2017 साली भाजप पक्षाकडून निवडणूक लढवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्या निवडणूकित सुद्धा त्यांना शिवसेनेची ऑफर होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. मात्र राज्यात महाविकास आघाडी येताच पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी वारे वाहू लागले. गेल्या दीड वर्षा पासून आदेश भाजप पक्षाचे काम करताना दिसत नव्हते.
त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती आणि अखेर आज दुपारी ठाण्यात आदेश भगत यांनी आपल्या पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केला. भाजपला खिंडार पडला असली तरी आदेश शिवसेनेत गेल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यामध्ये खुशीचे वातावरण आहे. आदेश सोबत काही पदाधिकारी यांचे पटत नसत, तशी चर्चा सुद्धा सुरू असत. तर आदेश गेल्याने पक्षाला काहीसा फरक पडणार नाही असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.