मलंगगड येथे १०० ड्रम केमिकल पकडून देणाऱ्या युवकाचा सन्मान

मलंगगड येथील कुशीवली गावच्या डोंगरात १०० पेक्षा अधिक केमिकल ड्रम हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता जमिनीत गाडले जात होते.
मलंगगड येथे १०० ड्रम केमिकल पकडून देणाऱ्या युवकाचा सन्मान
मलंगगड येथे १०० ड्रम केमिकल पकडून देणाऱ्या युवकाचा सन्मानप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : मलंगगड येथील कुशीवली गावच्या डोंगरात १०० पेक्षा अधिक केमिकल ड्रम हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता जमिनीत गाडले जात होते. यावेळी याची माहिती पत्रकार शुभम साळुंके यांनी हिललाईन पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली.

हे देखील पहा -

या केमिकलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता होती. मोठ्या प्रमाणात केमिकल ड्रम पकडून देऊन व लाच फेटाळून शुभम साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. साळुंके यांनी केलेल्या कामगिरी बद्दल कामा संघटनेने सन्मान पत्र देत गौरव केला आहे.

मलंगगड येथे १०० ड्रम केमिकल पकडून देणाऱ्या युवकाचा सन्मान
या शाळेत शिकवला जातो वृक्षारोपण विषय !

साळुंके यांनी मलंगगड भागातील अनेक विषय आपल्या लेखणीतून मांडले आहेत. ग्रामीण भागात आणि आगरी समाजात तरुण पत्रकार म्हणून साळुंके प्रसिद्ध आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com