Kalyan Breaking: शिक्षिकेनं 'जय शिवराय', 'जय श्रीराम' लिहिलेलं पोस्टकार्ड फाडलं; हिंदुत्ववादी कार्यकर्ते शाळेत धडकले, व्यवस्थापनानं माफी मागितली

Kalyan News: पोस्टकार्ड फाडणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली. अखेर शाळा या प्रशासनाने संबंधित शिक्षिकेच्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली.
Kalyan Breaking News
Kalyan Breaking NewsSAAM TV
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Latest News:

कल्याणमधील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षिकेने एका विद्यार्थ्यांचे पोस्टकार्ड फाडल्याच्या आरोपानंतर हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजप,मनसे, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक दिली.

या घटनेनंतर पोस्टकार्ड फाडणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली. अखेर शाळा या प्रशासनाने संबंधित शिक्षिकेच्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्याच्या पोस्टकार्डवर 'जय शिवराय', 'जय श्रीराम' असे लिहिले होते. मात्र, हेच पोस्टकार्ड शिक्षिकेने फाडल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेत हनुमान चाळीसाचे पठण करत जय श्रीराम, जय शिवाजी-जय भवानी अशा घोषणा देत आंदोलन केले.

या आंदोलकांकडून पोस्टकार्ड फाडणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली. आंदोलकांच्या आक्रमक आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आणि संबंधित शिक्षिकेने घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने माफी मागितली. (Kalyan News)

Kalyan Breaking News
Chhagan Bhujbal News: जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळ यांचं ओपन चॅलेंज

कुठे घडली घटना?

कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरातील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टकार्ड फाडलं . या पोस्टकार्डवर 'जय श्रीराम', 'जय शिवराय' असा मजकूर लिहलेला होता.

या घटनेनंतर आज बजरंग दल, भाजप, मनसे, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली . संबंधित शिक्षकेने जाणीवपूर्वक हे पोस्टर पाडल्याचा आरोप केला, त्या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Breaking News
Sharad Pawar On Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी विरोधात आता शरद पवार मैदानात, रास्तारोको करणार

दरम्यान, या कार्यकर्त्यांनी शाळेत हनुमान चालीसा पठण करत जय शिवराय जय श्रीराम घोषणा दिल्या . त्यामुळे काही काळ शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा केली. तसेत या संबंधित शिक्षकेने माफी मागावी अशी मागणी केली. त्यायानंतर प्रकरणी शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली तर संबंधित शिक्षकेने माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com