
मणिपूरपासून सुरू झालेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आसाम सरकारने अडवले होते. तसेच राहुल गांधींना आसाम सरकारने अटकाव केला. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद मुंबईत देखील पाहायला मिळाले.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 'हिंमता बिस्व सरमा भारत जोडो न्याय यात्रेला घाबरतात', असं यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी आमदार भाई जगताप, मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, माजी आमदार मधु चव्हाण,मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस तुषार गायकवाड व संदीप शुक्ला, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, अजंठा यादव, काँग्रेस नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Marathi News)
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ही मणिपूरपासून सुरू झाली होती. परंतु, आसाम सरकारने यात्रेमध्ये विघ्न आणले आणि याचे पडसाद हे देशभर उमटले. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आसाम सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. हिटलरशाही असून याचा विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन केले.
शांतीपूर्वक भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना यात्रेला भाजप सरकारने गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला. तसेच यात्रेदरम्यान राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. आमचा लढा हा सुरूच राहणार, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.