Pune Landslide News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दरड कोससळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. आता तीनपैकी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. एक लेन अजुनही बंद आहे. (Latest Marathi News)
सदरचा मातीचा मलबा बाजुला करून मध्यरात्री आडीच वाजण्याच्या सुमारास दोन लेन वरून वाहतुक सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या आणि शोल्डर लेनवर दरडीचा मलबा बाजूला काढून ठेवण्यात आला आहे. या दरड दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहतुक वाहतुक संथ गतीने सुरु आहे. (Pune News)
एक लेन बंद असल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील लगदा रात्री अडीच वाजेपर्यंत हटविण्यात आली होता. त्यामुळे दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी
सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.