

अजय दुधाणे, बदलापूर
Badlapur News: मुंबईसह ठाण्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस (Mumbai Rainfall) पडत आहे. बदलापूर, उल्हासनगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले असून बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसामुळे बदलापूरमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून अंबरनाथ-बदलापूर लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सीएसएमटी ते अंबरनाथ आणि बदलापूर ते कर्जत लोकलसेवा (Badlapur To Karjat Local Service) सुरू आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि बदलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. या नदीची इशारा पातळी ओलांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज झाले असून ते सतत आढावा घेत आहेत.अशामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. नागरिकांना या पाण्यातूनच जावे लागत आहेत. पाणी साचल्यामुळे स्टेशन परिसरात मोठ वाहतूक कोंडी झाली आहे. ऐवढंच नाही तर बदलापूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
कल्याण- डोंबिवलीत जोरदार पाऊस पडत आहे. या पावासामुळे दोन्ही ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोडवरील विठ्ठववाडी स्मशान भूमिजवळील पुलावर वाळधूनी नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे कल्याण पूर्वकडून विठ्ठलवाडी उल्हासनगर येथे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक वाळधूनी पूल आणि पत्रिपुल मार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, बदलापूर बॅरेज येथे उल्हास नदीने इशारा पाण्याची पातळी ओलांडली आहे. नदीने धोक्याची पातळी पार केल्यास म.जी.प्रा चे बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र कधीही बंद केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणीसाठा करून ठेवावा. तसंच पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील नागरिकांना पालिकेकडून आव्हान करण्यात येत आहे की, सध्य सरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. सद्याची परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे काही अडचणी आल्यास उल्हासनगर महापालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.