Stent and Angioplasty Fraud : हॉस्पिटल्समध्ये हार्ट सर्जरीचं स्कॅम, पैशांसाठी रुग्णांच्या हृदयात स्टेंट? काय आहे नेमकं प्रकरण? VIDEO

heart fraud : आरोग्य व्यवस्थेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात अँजिओप्लास्टीच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरु असल्याची बाब उघडकीस आली आहे. अँजिओप्लास्टीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे.
heart
health Tips in marathiSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : अचानक तुमच्या छातीत दुखल्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला जाता आणि तुम्हाला हृदयात स्टेंट टाकायला सांगितलं असेल तर जरा थांबा.... कारण सध्या देशात अँजिओप्लास्टीच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरुय. आयुष्यमान योजनेंतर्गत मिळणारे उपचाराचे पैसे लाटण्यासाठी एजंटच्या माध्यमातून सुरू असलेला अँजिओप्लास्टीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झालाय.

heart
Online Shopping Scams :ऑनलाईन खरेदी करताय? या ५ गोष्टी ठेवा लक्षात, नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

गुजरातमधील ख्याति मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रोग निदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.. या शिबीरात 90 लोकांची तपासणी करण्यात आली.. त्यातील 19 रुग्णांची नकली अँजिओप्लास्टी करत 7 रुग्णांच्या हृदयात स्टेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...तर यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याने हा घोटाळा उघड झालाय...मात्र अँजिओप्लास्टीची गरज नेमकी कधी असते? पाहूयात...

heart
Petrol Pump Scam : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मीटरमध्ये फक्त '0' नाही तर हे देखील तपासा; दुर्लक्ष केलं तर होऊ शकतं मोठं नुकसान

अँजिओप्लास्टीची गरज कधी असते?

रक्तवाहिन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज असल्यास

चालताना धाप लागत असेल तर

छातीत जास्त वेदना होत असल्यास अँजिओप्लास्टीची आवश्यकता

पायऱ्या चढल्यानंतर आणि वजन उचलल्यानंतर छातीत कळ येत असल्यास

heart
Digital Arrest Scam: सायबर ठगाकडून महिलेकडून उकाळले लाखो रुपये; डिजिटल अरेस्ट करत केलं विवस्त्र

अँजिओप्लास्टीचा सुळसुळाट सुरु असल्यानेच डॉक्टरांनी आपल्या सेकंड ओपिनियन पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. भारतात अँजिओप्लास्टीचे कुठलेही नियम नाहीत. भारतात दरवर्षी साडे चार लाख रुग्णांवर अँजिओप्लास्टी केली जाते. तर अनेकदा गरज नसताना अँजिओप्लास्टी केल्याने रुग्णांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.. त्यामुळे सरकारने शस्त्रक्रियेचे नियम आणि स्टँडर्ड ठरवून हा पैशासाठीचा गोरखधंदा रोखायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com