मुंबई: एचडीएफसी बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रेकरिंग डिपॉझिट (RD) च्या व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे बँकेत एफडी आणि आरडी करणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे.
एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याजदरात ०.४० टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. आरडीच्या व्याजदरातही तितकीच वाढ केलेली आहे. बँकांचे नवीन व्याजदर १८ ऑगस्ट २०२२ पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे.
यापूर्वी अनेक लहान-मोठ्या बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केलेली आहे. त्यात भारतीय स्टेट बँक (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), कोटक महिंद्रा बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स आदी बँकांचा समावेश आहे. अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर बँकांनी कर्जांवरील व्याजदरांत वाढ करण्यासह फिक्स्ड डिपॉझिटवरील (मुदत ठेवी) व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
पाहा व्हिडीओ -
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठीच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज मिळेल. यापूर्वी तो ५.३५ टक्के इतका होता. त्यामुळे यामध्ये आता ०.१५ टक्क्याची वाढ झाली आहे. दोन वर्षे एक दिवस ते तीन वर्षे मुदतीच्या कालावधीसाठी असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ग्राहकांना ५.५० टक्के व्याज मिळेल. तीन वर्षे एक दिवस ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर ०.४० टक्के वाढवला आहे. व्याजाचा दर ५.१० टक्क्यावरून वाढवून तो ६.१० टक्के करण्यात आला आहे.
बँकेने रेकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरातही वाढ केली आहे. त्यात ०.५० टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. ६ महिने ते १२० महिन्यांसाठीच्या आरडीवर बँक ३.७५ टक्क्यापासून ६.१० टक्क्यापर्यंत व्याज देईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ४.२५ ते ६.६० टक्क्यांपर्यंत आहे. १२ महिने, १५ महिने आणि २४ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजाचा दर ५.३५ टक्क्यांपर्यंत असेल. ३९ महिने, ४८ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर ६.१० टक्के असेल.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.