मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ नवी स्थानके लवकरच सुरू होणार; लोकलच्या फेऱ्याही वाढणार

Mumbai Local Update: लोकल ट्रेनच्या नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांना मिळणार दिलासा. गव्हाण आणि तारघर ही दोन नवी स्थानके लवकरच जनतेसाठी खुली होणार.
Navi Mumbai Local
Mumbai Local NewsSaam Tv
Published On
Summary
  • नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा.

  • गव्हाण - तारघर ही दोन नवी स्थानके जनतेसाठी खुली होणार.

  • तारघर स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात.

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल ट्रेनच्या नेरूळ - उरण मार्गावरील प्रवाशांची लवकरच गर्दीपासून सुटका होणार आहे. नवीन गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. तसेच लोकलच्या फेऱ्या देखील वाढवणार असल्याची माहिती आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त हार्बर मार्गावर लवकरच दोन नवीन स्थानके उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना दोन नवीन स्थानके उपलब्ध होतील.

अलिकडेच, हार्बर मार्गावरील नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग खुला करण्यात आला आहे. खारकोपर ते उरण मार्ग आता प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. नेरूळ ते उरण मार्गावर सध्या ११ स्थानके आहेत. यापैकी दोन स्थानकांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहेत.

Navi Mumbai Local
पुण्यातील उच्चभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय; मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींचा काळा धंदा

उरण मार्गावरील गव्हाण आणि तारघर या दोन स्थानकांचे बांधकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. ही स्थानके लवकरच जनतेसाठी खुली होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना याचा नक्कीच फायदा होईल. बेलापूर ते बामनडोंगरीदरम्यान, तारघर स्टेशन बांधले जाईल. तर, खारकोपर आणि शेमातीखारदरम्यान, गव्हाण स्टेशन बांधले जाईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल. दरम्यान, विमानतळाजवळ असलेल्या तारघर रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Navi Mumbai Local
बायकोला बेडवरच चाकूने क्रूरपणे संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; नेमकं कारण काय?

या रेल्वे मार्गावर ११ स्थानके असतील

या मार्गावर एकूण ११ रेल्वे स्थानके आहेत. नेरूळ, सीवूड - दारावे, सागरसंगम, तारघर, बामनडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रंजनपाडा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेने सीवूड दारावे - बेलापूर उरण रेल्वे मार्गावर २० अतिरिक्त लोकल गाड्यांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये जाहीर होणाऱ्या नवीन वेळापत्रकात या वाढीव सेवांचा समावेश केला जाईल, यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com