इतर पक्षांनीही मराठी भाषा दिन साजरा केला याचा आनंद : आ.राजू पाटील

डोंबिवलीत मराठी भाषा दिनानिमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इतर पक्षांनीही मराठी भाषा दिन साजरा केला याचा आनंद : आ.राजू पाटील
इतर पक्षांनीही मराठी भाषा दिन साजरा केला याचा आनंद : आ.राजू पाटीलSaamTvNews
Published On

डोंबिवली :  डोंबिवलीत मराठी भाषा दिनानिमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे तर्फे आज मोठ्या प्रमाणात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. तसेच डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे 'एक दौड जवानांसाठी' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. या दौड मध्ये 100 हुन अधिक नागरिक, खेळाडू, डॉक्टर सहभागी झाले होते.  रात्री 12 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून धावायला सुरवात केली आणि डोंबिवली येथे सकाळी 9 ला पोहोचले. या धावपटूंचा सन्मान मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील पहा :

यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा आवाहन केले. तसेच पत्रकारांशी बोलताना सांगितले की मराठी भाषा दिन या निमित्ताने आम्ही अनेक वर्षापासून कार्यक्रम करत असतो. राजसाहेबांचे तर आम्हाला स्पष्ट आदेश आहेत की हा कार्यक्रम प्रत्येक शाखे-शाखेत झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही नियोजन देखील करत असतो. आम्हाला खरच आनंद आहे, इतर पक्ष देखील त्याचे अनुकरण करतायत आणि हा दिवस साजरा करत आहेत. मराठी वाढली पाहिजे मराठी टिकली पाहिजे असेही पाटील म्हणाले.

इतर पक्षांनीही मराठी भाषा दिन साजरा केला याचा आनंद : आ.राजू पाटील
दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीच चौकशी करणार : ऊर्जामंत्री

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत शिवसेना-भाजप मध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करत, पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता यावर मनसे आमदार  राजू  पाटील यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, मागच्यावेळी निवडणूक वेळी घशात हात घालून दात काढत होते, आता अजून काय काढत बसतील. तूर्तास ते एकमेकांचे कपडे फाडत आहे. शिवसेना-भाजप पक्ष हे दोघेही सक्षम फेल ठरलेले आहेत आणि निवडणूकीपूर्वी आपल्याकडे लक्ष कसे वेधता येईल, यासाठी भांडत आहेत

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com