Mulund News : माझ्याकडे का पाहतो? रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातलं, Video

Mumbai Mulund News : रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातल्याची घटना घडली आहे. मुलुंडमधील एका जीममध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनरच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माझ्याकडे का पाहतो? रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातलं
Mulund NewsSaam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या मुलुंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवघर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरने जिम करण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात व्यायाम करण्यास वापरण्यात येणारा लाडकी मुदगल मारल्याची घटना घडली आहे. मुलुंडमधील एका जिममधील हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुलुंडमधील फिटनेस इंटलिजियस जिममधील प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माझ्याकडे का पाहतो? रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातलं
Kalyan Crime News : एकाच रात्रीत चार दुकानासह एका घरात चोरी; चोरट्यांनी लांबविला लाखोचा मुद्देमाल

नेमकं काय घडलं?

मुलुंड येथील फिटनेस इंटलिजियस जिममधील मारहाणीची बुधवारी संध्याकाळची घटना आहे. युगेश शिंदे हा २० वर्षीय तरुण या जिममध्ये जिम करत असताना या जिममधील ट्रेनर द्यरव नाकेल याने त्याला ही मारहाण केली आहे. युगेश त्याच्याकडे पाहत असल्याच्या रागातून त्यानेही मारहाण केली आहे. या प्रकरणी युगेशच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

माझ्याकडे का पाहतो? रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातलं
Shirpur Crime News : पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; व्यसन करून येत असल्याने झाला होता वाद

माजी मंत्र्यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला

माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला केला. घरासमोर थांबलेले असताना २ जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. तर पीए ललिल अब्बड यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com