
रत्नागिरी : 'आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं,' असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना, शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याबाबतची खंतही भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवली. तसेच, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत 'मला शिवसेना पक्षात भाषणं करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचं ते करतो. पण, मी कुणाची हुजरेगिरी कर नाहीत, हा ला हा किंवा ना ला ना... असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे', असंही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवलं. गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबीरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'शिवसेनेचा शाखाप्रमुखच हाच शिवसेनेचा कणा होता, पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचं मला दिसलं, म्हणून त्याच अनुषंगाने आज शिवेसना पक्षाच्यावतीने शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे, परंतु शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं कारण नाही,' असं भास्कर जाधव यांनी म्हचलं आहे. तसेच, राजकीय निवृत्तीचे संकेतही आजच्या शिबीरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहेत.
संजय राऊतांवर परखडपणे भाष्य
'संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात. पण, मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचं मला चांगलं भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज, असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसं होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात,' असं जाधव यांनी सांगितलं. 'मला भाषण करायला मिळालं पाहिजे असं अजिबात म्हणणं नाही, भाषणाबद्दल नाराजीचा विषयच नाही,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.