नाणार प्रकल्प होणार की नाही? जयंत पाटील म्हणाले...

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Jayant Patil
Jayant Patil Saam TV
Published On

मुंबई: कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण (Nanar Project) प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले. या विधानानंतर नाणार प्रकल्पाचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. यावर आता कोकणातील नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

नाणारमध्ये (Nanar) रिफायनरीचा प्रस्ताव होता. पर्यावरणाच्या मुद्द्याचा विचार केला आहे. नाणारला पर्यायी जागा मिळाली तर सरकार विचार करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. कोकणवासियांनी पुन्हा या प्रकल्पाला विरोध सुरु केला आहे. या प्रकल्पामुळे प्रदुषण वाढणार असल्याचे मतं कोकणवासियांनी व्यक्त केले आहे.

हे देखील पहा

यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोरोना (Corona) वरील निर्बंधावर बोलताना म्हणाले, राज्यातील निर्बंध जवळपास हटले आहेत. पण चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले आहेत. चीनमध्ये (China) काही शहरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. त्यामुळे थोोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यूपीए अध्यक्ष निर्णय सर्वांनी ठरवून घेतला पाहिजे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आता अध्यक्ष आहेत. एकत्र येत सगळ्यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय ध्यायला पाहिजे असेही पाटील म्हणाले. काल राष्ट्रवादीच्या अस्लम शेख यांनी शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याचे मतं व्यक्त केले होते.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com