सुशांत सावंत
मुंबई - शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल उस्मानाबादमध्ये आपण म्हतारा झालो म्हणून मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील असे व्यक्तव्य केले होते. आता शरद पवार यांच्या याच व्यक्तव्यावर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. काल त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न मिळ्यामुळे हताश होऊन ते बोलले असतील अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
हे देखील पहा -
शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांचा राग यामुळेच आहे कारण माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ खोत असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच या महाराष्ट्रील प्रस्थापितांचा तीळपापड होत आहे. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात असे देखील गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.
मी पवार साहेबांना सांगू इच्छीतो की महाराष्ट्रात २०१९ ला फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात साताऱ्यात पावसात भिजून सुद्घा फक्त ५४ च आमदार निवडूण आले त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडूण दिले अशा खोट्या थापा मारणं आता बंद करा अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
पुढे पडळकर म्हणाले की, आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं असे देखील ते यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.