कोण म्हणतं मी म्हातारा झालो, मी थकलो, हा गाडा सुरूच राहील- शरद पवार

या जिल्ह्याने भरपूर साथ दिली, मात्र आता जे गेले ते गेले असे म्हणत आ.राणाजगजितसिंह पाटील यांना पवारांनी टोला लगावला आहे.
sharad pawar
sharad pawar Saam Tv
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद: मी भाषण सुरु करण्यपूर्वी कुणीतरी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला, यापूर्वी देखील माझ्या वयाचा उल्लेख होत राहिला आहे की मी 82 वर्षांचा झालो, म्हातारा झालो, पण हे कोणाला सांगता मी म्हतारा झालो म्हणून मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील असे म्हणत जिल्ह्यातील मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यात उत्साह आणण्याचं प्रयत्न खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. पवार हे आज उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District) दौर्‍यावर होते. जिल्हा परिषद सदस्य तसेच युवती आघाडीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या मतदार संघातील समुद्रवाणी आणि पाडूळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा निमित्त पवार आले होते.

दरम्यान कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या जिल्ह्याने अनेक वर्ष साथ दिली आहे. मात्र काही लोक आता सोडून गेले त्यांची काही चिंता करायची गरज नाही. जे गेले ते गेले असे म्हणत अप्रत्यक्ष भाजपाचे राणाजगजित सिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांना टोला लगावला तसेच इथली जी तरुण पिढी आहे. जे पक्षाच काम करते आहे त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी इथं आलो असल्याचे पवारांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com