दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजीला गावी जाण्यासाठी प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. हीच बाब घेता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून आणखी ९ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. नागपूर ते सीएसएमटी, सीएसएमटी ते दानापूरदरम्यान या गाड्या धावणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईला येण्यासाठी गुरुवारी रात्री स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल. ही ट्रेन १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल.
या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईहून दानापूर येथे जाण्यासाठी सीएसएमटी-दानापूर स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे.
ही ट्रेन १८ आणि २५ नोव्हेंबरला सकाळी ११.५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता दानापूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ही ट्रेन १९ आणि २६ नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकरा वाजता सीएसएमटीला येईल.
सीएसएमटी-दानापूर या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.