Gautam Gaikwad : सिंहगडावरुन पडला, ५ दिवस जंगलात अडकला; गौतम गायकवाडबद्दल धक्कादायक माहिती समोर

Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगडावरुन खाली दरीमध्ये कोसळलेला गौतम गायकवाड हा तरुण सापडला आहे. या गौतम गायकवाडवर २० लाख रुपयांचे कर्ज होते अशी माहिती समोर आली आहे.
Gautam Gaikwad Sinhgad
Gautam Gaikwad Sinhgadsaam tv
Published On
Summary
  • पुण्यातील सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड शंभर तासांनंतर जिवंत सापडला असून त्याच्यावर २० लाखांचं कर्ज होतं.

  • कर्ज वसुलीसाठी त्याला सतत धमकीचे फोन येत होते, त्यामुळे अपघात, घातपात की मृत्यूचा बनाव यावर संशय निर्माण झाला.

  • जंगलात चार दिवस उपाशीपोटी भटकंती केल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तो बाहेर आला व सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

Gautam Gaikwad Sinhgad Pune : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड हा तरुण काल (२५ ऑगस्ट) सापडला. सिंहगडाच्या तानाजी कडा येथील हवा पॉइंटजवळ गेल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. पाच दिवसांपासून बेपत्ता होता. गडावरील स्थानिक नागरिकांनी गौतम सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर गौतमला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गौतम गायकवाड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली होती. गौतमवर तब्बल २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. त्याला वारंवार वसुलीसाठी धमकीचे फोन येते होते. त्यामुळे गौतम बेपत्ता झाल्यानंतर त्याचा खरंच अपघात झाला की घातपात झाला असा प्रश्न पोलिसांसमोर होता. याशिवाय गौतमने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला नाही ना? असाही संशय व्यक्त करण्यात आला होता.

Gautam Gaikwad Sinhgad
Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला

रविवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी तानाजी मालुसरे कड्यावरुन खाली पडलेला गौतम गायकवाड शंभर तासानंतर सापडला. गौतमवर पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. १०० तास गौतमने जंगलात कसा राहिला याची हकीकत गौतमने त्याच्या आईला सांगितली. गौतमच्या आईवडिलांनी ही माहिती माध्यमांशी संवाद साधताना सांगितली.

Gautam Gaikwad Sinhgad
Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

२० ऑगस्ट रोजी गौतम हैदराबादहून त्याच्या मित्रांसह पुण्यातील सिंहगडावर गेला. एक कुत्रा किल्ल्यावरुन खाली पडत असल्याचे गौतमने पाहिले. त्याला वाचवताना गौतम आणि कुत्रा दोघेही दरीत पडले. गौतम जंगलामध्ये चार दिवस फिरत राहिला. त्याला परतण्याचा रस्ता सापडला नाही. अन्नपाण्याशिवाय ४ दिवस त्याने जंगलामध्ये काढले. त्याला किडे चावत होते. मध्येच चक्कर ये होती. ३ दिवसानंतर तो शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर तो गड चढत वर आला. स्थानिकांनी त्याला पाहिले आणि त्याचा जीव वाचला, अशी माहिती गौतमच्या आईने दिली आहे.

Gautam Gaikwad Sinhgad
Actor Death : KGF चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com