Garba Timings: आनंदाची बातमी! आता पुढचे ३ दिवस रात्री १२ पर्यंत खेळता येणार गरबा-दांडिया

Garba Timing Increases till 12: गरबाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळता येणार आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
Garba Timings
Garba TimingsSaam Tv
Published On
Summary

गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी

आता सप्तमी, अष्टमी आणि नवमीला रात्री १२पर्यंत खेळता येणार गरबा

आवाजाच्या मर्यादेचे पालन करुन

नवरात्र सुरु आहे. नवरात्रीत नऊ दिवस गरबा-दांडिया खेळला जातो. नऊ दिवस सर्वजण देवीची भक्तीभावाने पूजा करतात. अनेक ठिकाणी रात्री गरबा खेळला जातो. दरम्यान, आज वीकेंड असल्यामुळे गरबा खेळायला खूप गर्दी असणार आहे. त्यामुळेच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुढचे तीन दिवस रात्री १२वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळता येणार आहे.

Garba Timings
Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. यामध्ये नवरात्रीत सप्तमी, अष्टमी आणि नवमी म्हणजे २९,३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली आहे.यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.

सध्या रात्री फक्त १० वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी आहे. रात्री १० वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवनागी असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. त्यामुळेच आता गरबा प्रेमींसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पुढचे तीन दिवस रात्री १२ पर्यंत दांडिया खेळता येणार आहे.यासाठी काही अटीदेखील निश्चित करण्यात आल्या आहे.

अटी

गरबा खेळण्यासाठी मिळालेल्या कालावधीत आवाजांच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.

उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.ध्वनी प्रदूषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करणे आवश्यक राहील. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल.

Garba Timings
Garba: 'गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री'; आधार कार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश?

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वेबसाइटवर हा आदेश प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत नियमांचे पालन करुन गरबा खेळता येणार आहे. मात्र, गरबा खेळताना आवाजाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्याचे पालन करायचे आहे.

Garba Timings
Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com