Ganpati Special Train 2025 : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! रेल्वे तिकीटच्या बुकिंगला सुरूवात

Ganpati Special Kokan Train Reservation : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षण सुरु झालं आहे.
Ganpati Special Train 2025
Ganpati Special Train 2025Saam Tv
Published On

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त आता तिकीट आरक्षण आजपासून सुरु होणार आहे. कोकणात (Kokan Railway For Ganeshotsav) जाणाऱ्या लोकल ट्रेनच तुम्हाला आजपासून आरक्षण करता येणार आहे. गणेशोत्साव २७ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. दोन महिने आधीच आरक्षण सुरु करण्यात आले आहे. (Ganpati Special Train)

Ganpati Special Train 2025
Vande Bharat : परभणी, नांदेडला मिळाली वंदे भारत एक्सप्रेस, मुंबईहून कधी सुटणार, तिकिट किती?

गणेश चतुर्थीच्या आधी २२,२३,२४ हे शुक्रवार-शनिवार आणि रविवार आहे. या दिवशीच्या ट्रेनच्या तिकीट बुकिंगला सुरुवात झाली आहे.

मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात गणेशोत्सावासाठी जाते. प्रत्येक घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होते. त्यानिमित्त अतिरिक्त एसटी, बस आणि रेल्वे सोडल्या जातात. अनेकजण रेल्वेने प्रवास करणे निवडतात. दरम्यान, आता या रेल्वे गाड्यांच्या तिकीट आरक्षणाला सुरुवात झाली आहे.

आरक्षणाचं वेळापत्रक (Ganeshotsav Kokan Railway Reservation Timetable)

२२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या रेल्वेच्या तिकीटाचं आरक्षण आजपासून सुरु झालं आहे. २३ ऑगस्टच्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण उद्यापासून सुरु होईल. २४, २५ तारखेच्या रेल्वेच्या ट्रेनचं आरक्षण २६-२७ जून रोजी सुरु होणार आहे.

तिकीट बुकींग करताना काळजी घ्या (Ganeshotsav Special Train Ticket Booking)

रेल्वेचं आरक्षण करताना तुम्ही ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशीचं तिकीट बुकिंग करा.जर तुम्हाला २६ ऑगस्टचं कल्याण ते खेड/ चिपळूण/ कणकवली प्रवास करायचा असेल तर २६ जून २०२५ रोजी तिकीट बुकिंग सुरु होईल. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी प्रवास करणार आहात त्याच्याआधीच तिकीट बुक करा. गणेशोत्सवासाठीच्या रेल्वेचं तिकीट खूप लवकर फुल होते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा.

Ganpati Special Train 2025
Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू

कोकणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होते. त्यामुळे मुंबईतून लाखो लोक आपल्या गावी जातात. ते बाप्पाचे ११ दिवस हे खूप आनददायी असतात. त्यामुळे खूप आधीपासूनच चाकरमान्यांची तयारी सुरु असते. ही तयारी करण्यापूर्वी आधी तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक करा म्हणजे प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही.

Ganpati Special Train 2025
Indian Railway: निवृत्त झाल्यानंतरही मिळेल नोकरी! रेल्वे विभागाचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com