एकनिष्ठ कार्यकर्त्यावर NCP नं साेपवली महत्वाची जबाबदारी; एकमताने झाला निर्णय

आज सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांनी गणेश खांडगे यांची एकमताने निवड जाहीर केली.
ganesh khandge
ganesh khandgesaam tv
Published On

मावळ : मावळ (maval) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाच्या अध्यक्षपदी गणेश खांडगे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक धोरणानुसार मागील आठवड्यात मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा (resignation) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांच्याकडे दिल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण हाेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. (maval latest marathi news)

आज सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांनी गणेश खांडगे यांची एकमताने निवड जाहीर केली. गणेश खांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल सात वर्ष जबाबदारी सांभाळत युवकांचे मोठे संघटन उभे केले होते.

ganesh khandge
IMD ALERT: सावधान! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उद्या असेल उष्णतेची लाट

पक्ष संघटना हेच केंद्रबिंदू मानून मावळ तालुक्यातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागातील गावे, वाड्या वस्त्यांवर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार तसेच संघटनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे गणेश खांडगे यांनी निवडीनंतर बोलताना नमूद केले.

Edited by : Siddharth Latkar

ganesh khandge
Cristiano Ronaldo Hat-Trick: फुटबॉलमधील जागतिक विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोनं मोडला
ganesh khandge
NCP : राष्ट्रवादीच्या मावळ्यानं दिला पदाचा राजीनामा; उलट सुलट चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com