Anant Chaturdashi 2023: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल धावणार, कसं असेल मुंबई लोकलचं वेळापत्रक?

Anant Chaturdashi 2023: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. अनंत चतुर्दशीला मध्य रेल्वेने रेल्वेकडून रात्रभर लोकल सुविधा उपलब्ध असणार आहे.
Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablocksaam tv

Anant Chaturdashi 2023:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. अनंत चतुर्दशीला मध्य रेल्वेने रेल्वेकडून रात्रभर लोकल सुविधा उपलब्ध असणार आहे. मध्य रेल्वेकडून सीएसएमटी-कल्याण/ठाणे/बेलापूर स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे . (Latest Marathi News)

मध्य रेल्वेने अनंत चतुर्थीनिमित्त प्रवाशांच्या सोयासाठी मध्यरात्री विशेष लोकल सेवा उपलब्ध असणार आहे. मध्य रेल्वेकडून २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री सीएसएमटी-कल्याण/ठाणे/बेलापूर स्थानकांदरम्यान 10 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Local Megablock
Ganpati Visarjan 2023: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; विसर्जनाच्या दिवशी प्रमुख रस्ते राहणार बंद, वाचा यादी

मध्य रेल्वेमार्गावर डाऊन विशेष सेवा कशा असतील?

सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल हे सीएसएमटीहून 01.40 वाजता सुटेल, त्यानंतर ही लोकल कल्याणला 3.10 वाजता पोहणार आहे.

सीएसएमटी-ठाणे विशेष लोकल ही सीएसएमटीहून 02.30 वाजता सुटेल. ही लोकल पुढे 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.

सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून 03.25 वाजता सुटेल. त्यानंतर 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.

मध्य रेल्वेमार्गावर अप विशेष लोकलचं वेळापत्रक कसं असेल?

कल्याण-सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून 00.05 वाजता सुटेल. त्यानंतर ही 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ही ठाणे येथून 01.00 वाजता निघेल. त्यानंतर सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल.

ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ही ठाणे येथून 02.00 वाजता निघेल त्यानंतर सीएसएमटीला 03.00 वाजता पोहोचेल.

Mumbai Local Megablock
Dhangar Reservation Chaundi: धनगर समाजाचं उपोषण मागे; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश

हार्बर लाईन -डाऊन विशेष लोकलचं वेळापत्रक कसं असेल?

सीएसएमटी-बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून 01.30 वाजता सुटेल. त्यानंतर ही लोकल बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.

सीएसएमटी- बेलापूर विशेष लोकल ही सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल. त्यानंतर ही लोकल बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन अप विशेष लोकलचं वेळापत्रक कसं असेल?

बेलापूर -सीएसएमटी विशेष लोकल ही बेलापूरहून 01.15 वाजता सुटेल आणि त्यानंतर सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.

बेलापूर -सीएसएमटी विशेष लोकल ही बेलापूरहून 02.00 वाजता सुटेल. त्यानंतर सीएसएमटीला 03.05 वाजता पोहोचेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com