Ganpati Visarjan 2023: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; विसर्जनाच्या दिवशी प्रमुख रस्ते राहणार बंद, वाचा यादी

Ganpati Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी या सर्वच गणपतीचे विसर्जन केले जाते.
Ganpati Visarjan 2023
Ganpati Visarjan 2023Saam tv

सचिन जाधव

Pune Ganpati Visarjan:

पुण्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई असते. यंदा देखील पुण्यात गणेशोत्सवाची धुमधाम पाहायला मिळतेय. येत्या गुरुवारी गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. गणपती विसर्जनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Ganpati Visarjan 2023
Pune Ganapati Festival: सावधान! ड्रोन उडवाल तर थेट जेलमध्ये जाल; पुण्यात गणेशोत्सव काळात 'ड्रोनबंदी'

पुण्यात गणेशोत्सवाची एक वेगळी संस्कृती आहे. यामध्ये कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती हे मानाचे पाच गणपती आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या सर्वच गणपतीचे विसर्जन केले जाते.

२८ तारखेला सकाळी साडे आठ वाजल्यापासून पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. यासाठी शहरात २०५ सीसीटीव्ही कॅमेरे विसर्जन मार्गवर लावण्यात आले आहेत.

पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी हे रस्ते बंद राहणार

- शिवाजी रोड

- लक्ष्मी रोड

- बाजीराव रोड

- कुमठेकर रोड

- गणेश रोड

- केळकर रोड

- टिळक रोड

- शास्त्री रोड

- जंगली महाराज रोड

- कर्वे रस्ता

- फर्ग्युसन रोड

- भांडारकर रस्ता

- पुणे सातारा रोड

- सोलापूर रोड

- प्रभात रोड

- बगाडे रोड

- गुरुनानक रोड

पुण्यात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. 3865 गणेश मंडळांचं विसर्जनाचं नियोजन करण्यात आलंय. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. सारथी गणेशोत्सव गाईड 2023 लोकांच्या वाहतूक मार्गदर्शनासाठी नव्याने सुरू केली आहे. गणपती विसर्जनाच्या मुख्यमार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्या द्वारे पोलीस नजर ठेवणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोल ताशा पथकाची मर्यादित संख्या असणार आहे. एका पथकात ५० ढोल व १५ ताशे असतील. एका मंडळात २ ते ३ पथक वादन करू शकतील. १० मिनिटाचा वेळ वाजवण्यासाठी दिला आहे. रस्ते बंद असल्याने वाहतूक रिंग रोडवरून वळवली जाणार आहे

Ganpati Visarjan 2023
Ganapati Visrjan 2023: मुंबई - पुणे आणि मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री; कधी अन् किती तास राहणार बंद?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com