Language Controversy : छडी लागे छम छम, मराठी येई घमघम; शंकाराचार्यंसह सगळ्यांना मराठीची मोहिनी

marathi Language Controversy : राज्यात मराठी साठी पेटलेला वणवा आता शांत होतोय त्याला कारण आहे. आपल्या मराठीसाठी घेतलेला पुढाकार आणि मराठीची अनेकांना पडलेली मोहिनी पाहूयात.. मराठीसाठी भडकलेल्या मराठी माणसाच्या आंदोलनानंतर काय घडलंय...
Language Controversy
marathi Language ControversySaam tv
Published On

राज्यातलं वातावरण हिंदीसक्तीविरोधात तापलेलं असतांना फक्त याच पॉवरफुल्ल महिलांनी मराठीचं कौतुक केलंय असं नाही तर हिंदू धर्माचे संरक्षक वेदांतातून सनातन धर्माला अध्यात्मिकतेची दिशा देणाऱ्या शंकराचार्यांनी देखील अभिजात मराठीची पताका फडकवलीये.

Language Controversy
Baloch Army attack Pakistan: पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

राज्यात मराठी भाषेचं आंदोलन पेटलं आणि अनेक परभाषिकांनी मराठीतून व्यक्त व्हायला सुरूवात केली.. राज ठाकरेंनी मराठी नाकारणाऱ्यांना थेट अंगावर घेण्याचं आवाहन केलं होतं.

Language Controversy
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्याची चर्चा, जयंत पाटलांना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी हात सोडून आंदोलन करण्यात आली.. मात्र आता तेच हात जोडून मराठी शिकवणारेत. परप्रांतीय व्यापाऱ्यांसाठी मनसे थेट मराठी भाषेचे वर्ग घेणार आहे.

मनसेनं आधीपासूनच राज्यात मराठीचा आग्रह करत आक्रमकच भूमिका घेतली होती. एप्रिलमध्ये ठाकरे सेनेनं देखिल घाबरु नका मराठी शिका असं म्हणत परप्रांतियांसाठी क्लास घेतले होते. आणि आता ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवत मनसेनं मराठीचे वर्ग भरवल्यानं व्यापाऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.

Language Controversy
Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

एकूणच मराठीच्या मुद्दयावरून थेट गुद्यावर येण्याएऐवजी मनसेनं घेतलेला हा निर्णय स्तुत्यच. दुसरीकडे महाराष्ट्रात राहून, स्थानिकांसोबतच व्यवसाय करून पैसे कमावणाऱ्यांनीही आता अ आ इ ई चा पाठ गिरवायला सुरवात केली असले तर उत्तमच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com