
योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : बीडच्या केज कळंब रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. केज कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ कार तीन-चार वेळा उलटली. या अपघातात कार चालकासह त्याचे वृद्ध वडील जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज कळंब रस्त्यावर शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. साळेगाव जवळ मोहरील बाबा दर्ग्याजवळ अपघाताची घटना घडली. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार वेळा उलटली. यानंतर कार खड्ड्यात उलटली. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.
केज तालुक्यातील व्यंकट पंडित लाड हे शनिवारी त्यांच्या कुटुंबासह पुण्यातून त्यांच्या केज तालुक्यातील लाडेवडगावला जात होते. ते दुपारी ४:०० सुमारास साळेगावजवळ मोहरील बाबा दर्ग्याजवळ आले. त्यावेळी त्यांचं कारवरील नियंत्रण सुटून गाडी तीन ते चारवेळा उलटली. ही कार पुढे खड्यात उलटली. या अपघातात गाडीचा चालक व्यंकट लाड आणि त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे वडील पंडित लाड जखमी झाले. तसेच मागील सीटवर बसलेले गयाबाई पंडित लाड, प्रतीक्षा राहुल लाड आणि छाया मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या रस्त्याने प्रवास करीत असलेले गौतम बचुटे, त्यांचा भाऊ बलभीम बचुटे, मुलगा रितेश आणि पुतण्या यश आणि जनविकास सेवाभावी संस्थेचे शरद पवार यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यासाठी गाडीचे काच आणि दरवाजे तोडून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर एका खासगी वाहनातून त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले.
दरम्यान, अपघाताची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना देताच त्यांच्या आदेशाने पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, मुंडे, वाहतूक शाखेचे सिद्दिकी हे अपघातस्थळी हजर झाले. या अपघातात एक वर्षाची मुलगी सुखरूप आहे. अपघात ग्रस्त गाडीत आई प्रतीक्षा मुंडे हिच्या कुशीत असलेली एक वर्ष वयाची परीधी हिला मात्र साधे खरचटले देखील नाही. या अपघातातील जखमींना गाडी बाहेर काढण्यासाठी रितेश गौतम बचुटे याने हाताने काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाताला आणि पायाला खरचटून तेही किरकोळ जखमी झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.