Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

Share market investment : शेअर बाजारात एका शेअरमधील गुंतवणूक वर्षभरात एका लाखाची 8,400,000 रुपये झाली आहे. १०० रुपयांच्या शेअरने ही कमाल केली आहे.
cash
Share market Saam tv
Published On

शेअर बाजारात अनेक शेअर गुंतवणकदारांना मालामाल करतात. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना लखपती केलं आहे. एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. शेअर बाजारात जुलै महिन्यात १०० रुपये किंमत असलेल्या शेअरने गुंतवणूकदारांना तगडं रिटर्न दिलं आहे.

शेअर बाजारात २०२४ साली या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर या शेअरची किंमत ८४ लाख रुपये झाली असती. या शेअरने वर्षभरात ८,३८५ टक्के रिटर्न दिलं आहे.

cash
Baloch Army attack Pakistan: पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

एलीटकॉनने ९ जुलै २०२५ रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये मोठी घोषणा केली. कंपनीने दुबईच्या स्पाइसेज ट्रेडिंग एलएलसीला ७०० कोटींना खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मसाले, ड्राय फ्रुट्स, चहा आणि कॉफी सारख्या प्रॉडक्ट्सचा व्यापार करते.

शेअरच्या परफॉर्मन्सविषयी बोलायचं झालं तर ११ जुलै २०२५ रोजी शेअर बाजारात ४.९९ टक्क्यांच्या तेजीसह ९८ रुपयांवर बंद झाला. शेअर ९८ रुपयांमुळे ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या शेअरची निचांकी पातळी १.१० रुपये इतकी आहे. कंपनीचा मार्केट कॅप हा १५,६६५ कोटी रुपये आहे.

एका वर्षांपूर्वी शेअरची किंमत १ रुपये होती. त्यानंतर या शेअरची किंमत ही १०० रुपयांवर पोहोचली आहे.

शेअर रिटर्नचा इतिहास?

एका आठवड्यात २७. ६० टक्क्यांची तेजी

१ महिन्यात ६९.१४ टक्क्यांची वाढ

३ महिन्यात १५८.४४ टक्क्यांची उसळी

वर्षभरात गुंतवणूकदारांना ८६३.६२ टक्क्यांचं रिटर्न

cash
Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानकात वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेस थांबणार? टर्मिनस दर्जाचा मुद्दा थेट रेल्वेमंत्रालयात पोहोचला

एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनी कंस्ट्रक्शन, रिअल एस्टेट आणि कंन्सल्टसींचा व्यवसाय करते. आता ही कंपनी एफएमसीसीच्या क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. शेअर सध्या मल्टिबॅगर ठरला आहे. तर शेअरच्या गुंतवणुकीत जोखीम देखील असते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com