नवी मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत १४ गावे वगळली, निवडणुकीपासून राहणार वंचित ?

इतर महापालिकांबरोबर नवी मुंबई महापालिकेनेही आरक्षणाची सोडत जाहीर केली. परंतु...
MNS mla raju patil
MNS mla raju patilsaam tv

डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश हा नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal corporation) केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. परंतु,अद्यापही ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली नाहीत. इतर महापालिकांबरोबर नवी मुंबई महापालिकेने आरक्षणाची सोडत जाहीर केली. मात्र, या १४ गावांना वगळून ही सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे ही गावे नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून (Election) वंचित राहतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

MNS mla raju patil
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मनात आहे तरी काय ? 'या' ट्विटमुळं संभ्रम

दरम्यान, यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील आणि सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे.यावेळी बांगर यांनी सांगितलं की, १४ गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अजूनही अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांना सध्याच्या निवडणुक प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आले नाही.

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी की, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 27 गावांचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे.त्यांनंतर आता 27 गांवांच्या बाजूला असलेल्या 14 गावांची चर्चा सुरू आहे.मात्र 14 गावाचा विषय अद्याप रखडलेला दिसतो आहे.१४ गावांचा समावेश हा नवी मुंबई महापालिका केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ यांनी अधिवेशनात केली होती. परंतु, अद्यापही ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली नाहीत.इतर महापालिका बरोबर नवीमुंबई महापालिकेने आरक्षणाच्या सोडत जाहीर केली.मात्र ही सोडत १४ गाव विरहितच होती. त्यामुळे ही गावे नवी मुंबई महापालिका निवडणूकीपासून वंचित राहतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

MNS mla raju patil
T-20 बंदच करा, फक्त विश्वचषक स्पर्धा खेळवा, रवी शास्त्री म्हणाले...

याबाबत आज मनसेचे आमदार राजू पाटील आणि सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.यावेळी आमदार यांनी सांगितले की इथे अशी माहिती मिळाली की इकडून प्रस्थाव पण गेलेला आहे. कोकण आयुक्तांकडे आहे, पुढे युडीला जाऊन प्रोसेस चालू आहे.एकंदरीत सर्व सकारात्मक चाललेलं आमचे पालकमंत्री नगरविकास मंत्री स्वतःहून लक्ष देतात, असे आयुक्त साहेबांनी सांगितलं.बघूया आता निवडणूक जिथे लागल्या असतील तिथे सध्या निवडणूक होणार नसतील, तरी येत्या काळात ती गावे नवीमुबंई महापालिकेत येतील,असं चित्र आहे.

तर याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, १४ गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांचा सध्याच्या निवडणुकीचा ज्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलेला नाही.जेव्हा तो अध्यादेश निघेल तेव्हा तत्कालीन परिस्थिती नुसार निवडणूक निवडणूक आयोग जो निर्णय देईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

तसेच राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला, त्याचा निर्णय देखील अधिवेशनात घेतला. परंतु, आता निवडणूक प्रक्रिया थांबली होती ती सुप्रिम कोर्टाच्या डायरेक्शनने सुरु करण्याचा आदेश झाला आहे. तांत्रिक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल. या लोकांना ज्या मुलभूत सोयी सुविधा पाहिजे ते देण्याचे काम नक्की केले जाईल.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com