रश्मी पुराणिक
Kishori Pednekar News : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांनी कथित एसआर घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. कथित एसआरए घोटाळा प्रकरणावरून किशोरी पेडणेकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. एसआरएमध्ये घर देण्याच्या घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर दिवंगत भावाच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याला किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेत आरोप करताना म्हणाले की, 'मी वर्षभरापूर्वी सर्व पुरावे दिले होते. किशोरी पेडणेकर या चौकशीला घाबरत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दबावामुळे कोणताही चौकशी झाली नाही. कालच या संदर्भात मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझी मागणी मान्य करतील, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. (kirit somaiya allegations against Kishori Pednekar)
किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, 'किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेलं आहे. एसआरए ( झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ) गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः 'एसआरए' प्राधिकरणाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असे कोर्टाला कळविलेले आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.