Pune News: पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री गोळीबार; तरुण गंभीर जखमी, नागरिक धास्तावले

Pune Crime News: बाणेर परिसरात किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे.
firing in baner area one person injured pune police file fir
firing in baner area one person injured pune police file fir Saam TV
Published On

Pune Crime News

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणेर परिसरात किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

firing in baner area one person injured pune police file fir
Pune Crime News: पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, कोयत्याने सपासप वार करत तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

आकाश बाणेकर, असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा १ जिवंत राऊंड आणि २ केसेस जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जखमी आकाश याचा मित्र निलेश आणि आरोपींचा मित्र रोहित एकाच परिसरात राहतात. दोघेही एकाच मोटार कंपनीत कामाला होते. काही दिवसांपूर्वी कंपनीने रोहित याला कामावरून काढून टाकले होते. निलेश याच्यामुळे आपली नोकरी गेली, असा राग रोहितच्या मनात होता.

रविवारी रात्री रोहितने निलेशला बाणेर परिसरातील महाबळेश्वर हॉटेल समोरील ४५ अव्हेन्युव बिल्डींगजवळ भेटायला बोलावलं. निलेश आणि त्याचा मित्र आकाश तिथे गेले असता, त्याठिकाणी रोहितचे मित्र आरोपी आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे हजर होते.

आरोपींनी निलेशला शिवीगाळ करत त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांचा मित्र आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. निलेश याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अजूनही एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

firing in baner area one person injured pune police file fir
IND vs AUS: टीम इंडियाच्या हातून कसा निसटला वर्ल्डकप? दिग्गजांनी सांगितली पराभवाची कारणं; दोघांना धरलं जबाबदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com